रायगड (प्रतिनिधी विनया मेढेकर) : येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथील पूरग्रस्तांना १२०० पाण्याच्या बॉटल व १० बॉक्स बिस्कीटचे पुडे मदत म्हणून तहसील कार्यालय माणगाव येथे जमा करण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्तांना सध्या जास्त गरज असणारी चादर व बेडशीट मदत म्हणून देण्याचे न्यायाधीश श्रीमती इंगळे यांनी सुचविले होते.
त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी यानी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व न्यायिक अधिकारी यांच्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना अल्पशी मदत म्हणून ८० नग बेडशीट व ८० नग चादर तहसील कार्यालय महाड येथे देण्यात आले.
तसेच महाड न्यायालय येथे कार्यरत व महाड येथे राहणाऱ्या व जे पुरामुळे बाधित आहेत अशा कर्मचाऱ्यांना २० नग चादर व २० नग बेडशीट देण्यात आले.






