ऑलिंम्पिक : बॉक्सिंगमध्ये लवलीना पदकापासून फक्त एक विजय दूर

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग रिंगमध्ये यंदा भारताला पुरुष बॉक्सर्स खेळाडूंकडूनही पदकांची अपेक्षा होती. पण ते अपेक्षेवर खरे उतरण्यात अपयशी ठरले. पण महिला खेळाडूंनी पदकांची आशा कायम ठेवली आहे. मेरी कोमनंतर आता लवलिनाकडूनही भारताला आशा वाढल्या आहेत.

भारतीय महिला बॉक्सर लवलिनाने वेल्टरवेट गटात सामना जिंकत विजयी सुरवात केली. राउंड ऑफ १६ मध्ये लवलीनाने जर्मनीच्या बॉक्सरला आपल्या मजबूत ठोशांनी पराभूत केले. आणि सामना ३-३ ने जिंकला. लवलिनाचा यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिला सामना अपेक्षेप्रमाणे झाला. जर्मन बॉक्सरशी तिने जोरदार सुरवात केली. दोन्ही खेळाडूंनी आक्रमक बॉक्सिंगचा नजारा दाखवला. पहिली फेरी लवलीनाच्या नावावर झाली. दुसर्‍या फेरीत जर्मन बॉक्सरने तिच्या अनुभवाचा वापर केला, पण तिला यश मिळाले नाही. या फेरीतही लवलीना आघाडीवर राहिली.

पहिल्या दोन्ही फेरीत लवलीनाची आघाडी पाहिल्यानंतर जर्मन बॉक्सर अतिशय उत्साहाने रिंगमध्ये उतरली. तिने भारतीय प्रतिस्पर्धीवर जोरदार प्रहार करण्यास सुरवात केली. या फेरीत ती पुनरागमन करते की काय असे वाटत होते, पण जेव्हा सामना संपला तेव्हा विजय लवलीनाच्या खात्यात जमा झाला. राउंड ऑफ १६चा सामना जिंकत तिने उपांत्यपूर्व फेरीचे तिकिट आपल्या नावे केले.

आता उपांत्यपूर्व फेरीत भारतीय बॉक्सर लवलिनाचा सामना चिनी तैपेईच्या चेन नेनशी होणार आहे. राऊंड ऑफ १६च्या सामन्यात चेन नेनने इटलीच्या बॉक्सरला पराभूत केले. चिनी तैपेईच्या बॉक्सरने हा सामना लवलिनासारखाच स्पिलिट डिसिजनमध्ये जिंकला. २०१८च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्य सामन्यात चेनने लवलिनाला पराभूत करत सुवर्णपदकाच्या शर्यतीतून तिला बाहेर काढले होते. त्यामुळे यावेळी लवलिनाकडे हिशोब चुकता करण्याची संधी आहे. जर लवलिनाने चेनला पराभूत केले तर तिचं पदक पक्के होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here