हातकलंगणे (महाराष्ट्र सहक्राइम रिपोर्टर जनार्दन चव्हाण) : इंगळी ता हातकणंगले येथील पूरपरिस्थिती ची पाहणी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) व भाजप चे जेष्ठ नेते आण्णासाहेब शेंडुरे यांनी केली
यावेळी सोबत भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुहास जाधव ,युवा मोर्चा सरचिटणीस प्रविण रांगोळे , उद्योगपती लक्ष्मण चीनगुंडी,किशोर रांगोळे,कामगार संघटनेचे गुंडा वद्द, राजेश राठोड , पट्टणकोंडोली चे भाजप चे नेते राजू आडके,पत्रकार धनंजय टारे,दस्तगीर मुल्लाणी,शिवाजी पुजारी ,कुमार रांगोळे उपस्थित होते

यावेळी बोलताना अशोकराव माने(बापू) म्हणाले शेतीचे व घरांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे तरी तलाठी व ग्रामसेवक यांनी पाणी कमी झालेनंतर लवकरात लवकर पंचनामे करून बधितांना न्याय द्यावा. मी बाधितांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी शासनदरबारी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत माझी राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली,






