दलित पँथर मध्ये पारधी समाजातील पुरुष तसेच महिलांचा जाहिर प्रवेश – दलित पँथर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विश्वास मोरे

कोरेगाव (प्रतिनिधी) : दलित पँथरचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पँथर विश्वास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व खंबीर नेतृत्त्वाखाली बारामती तालुक्यातील पारधी समाज्यातील असंख्य पुरुष व महिलांचा दलित पँथरमध्ये जाहिर प्रवेश झाला. दलित पँथर बारामती तालुकाध्यक्षपदी आकाश काळे यांची यावेळी निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकारी आकाश काळे यांनी सर्व समाज बाधवांना बरोबर घेऊन सर्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दलित पॅथर च्या बारामती तालुका अध्यक्ष पदी आकाश विजय काळे यांची योग्य निवड करण्यात आल्याची चर्चा जोरात चालू होती.

यावेळी दलित पँथर चे पश्चिम महाराष्ट् उपाध्यक्ष पँथर विश्वास मोरे तसेच पारधी समाज सातारा जिल्हा अध्यक्ष गुड्या काळे, कोरेगाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ.माया कनवाळु, महिला आघाडि सातारा जिल्हा खजिनदार सौ.अश्विनी काळे, तुषार भोसले, विशाल काळे,रोहित काळे तसेच पँथरचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here