टोकियो : भारताच्या महिला बॉक्सर्सनी आपली विजयी कामगिरी सुरुच ठेवली आहे. आधी मेरी कोम आणि लवलीना यांनी आपआपले पहिले विजय मिळवल्यानंतर आज बॉक्सर पुजा रानीनेदेखील विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यामुळे आणखी एक सामना जिंकताच पुजा उपांत्य फेरीत पोहचेल. ज्यामुळे तिचे किमान कांस्यपदक निश्चित होईल. लवलीनानंतर यंदा उपांत्यूपूर्व फेरीत पोहोचणारी पुजा दुसरी बॉक्सर आहे.
बुधवारी ७५ किलो वजनी गटात भारताच्या पूजा राणीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता पदकापासून ती केवळ एक विजय दूर आहे. ३० वर्षीय पूजा राणीने ऑलिम्पिक स्पर्धांमधील पदार्पणाच्या लढतीत अल्जेरियाच्या २० वर्षीय इचारक चैबचा ५-० असा धुव्वा उडवला. पूजा राणी आणि चैबच्या वयातील १० वर्षांचा फरक या लढतीत दिसून आला. अनुभवी पूजाच्या हल्ल्यांपुढे युवा चैबचा निभाव लागला नाही.
It's ‘Bout time for Pooja Rani! 🥊
A thoroughly clinical performance by the Indian boxer has bumped her up to the quarter-final with an unanimous score of 5:0 🙌#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion | #Boxing | @BoxerPooja
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 28, 2021
पूजाच्या गाठीशी खूप अनुभव असल्याने दबाव असतानाही संयम राखण्यात तिला यश आले. चैबने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा फायदा पूजाला झाला. तिने उत्कृष्ट प्रतिहल्ला करत ही लढत ५-० अशा मोठ्या फरकाने जिंकली.






