उर्वरित सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघात पाच नवीन चेहऱ्यांना संधी

कोलंबो : कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर २७ जुलैला होणारा दुसरा सामना स्थगित करण्यात आला आणि नव्या वेळापत्रकानुसार २८ व २९ जुलैला दुसरा व तिसरा ट्वेंटी-२० सामना होणार आहे. कृणालच्या संपर्कात आलेल्या आठही खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे, परंतु त्यांना विलगिकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांचे खेळणे अवघड आहे. पण, एक आनंदाची बातमी म्हणजे कर्णधार शिखर धवन आजच्या सामन्यासाठी उपलब्ध आहे.

अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने, त्याच्या संपर्कात असलेले आठ खेळाडू हेही विलगिकरणात आहेत, तरीही मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. भारताचे ८ प्रमुख खेळाडू संघाबाहेर असल्यामुळे उर्वरित दोन ट्वेंटी-२० सामन्यांसाठी बीसीसीआयनं मुख्य संघात इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्षदीप सिंग, साई किशोर आणि समिरजीत सिंग या पाच नव्या चेहऱ्यांना सहभागी करून घेतेल गेले आहे. या सर्वांना श्रीलंका दौऱ्यावर नेट गोलंदाज म्हणून नेण्यात आले होते.

भारतीय संघ – शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया, इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here