ऑलिंम्पिकमधील हॉकी सामन्यातील वरुण कुमारचा अप्रतिम विजयी गोल; व्हायरल झाला व्हिडीओ

टोकियो : रियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता संघ अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात वरुण कुमारने तिसऱ्या क्वार्टरमधील अखेरच्या दोन मिनिटात शानदार ड्रॅग फ्लिकवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. वरुणचा प्रहार इतका जोरदार होता की, विरोधी खेळाडूंसह गोलकिपरला देखील चेंडू रोखता आला नाही. वरुणच्या या अप्रतिम गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने या सामन्याच्या अखेरच्या दोन मिनिटात २ गोल करत हा सामना ३-१ ने जिंकला. या विजयासह भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात वरुण कुमारने शानदार गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. तिसऱ्या क्वार्टरमधील अखेरच्या दोन मिनिटात वरुणने शानदार ड्रॅग फ्लिकवर गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. वरूणचा प्रहार इतका जोरदार होता की, विरोधी खेळाडूंसह गोलकिपरला देखील चेंडू रोखता आला नाही. वरुणच्या या अप्रतिम गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने या सामन्याच्या अखेरच्या दोन मिनिटात 2 गोल करत हा सामना 3-1 ने खिशात घातला. या विजयासह भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात वरुण कुमारने शानदार गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. तिसऱ्या क्वार्टरमधील अखेरच्या दोन मिनिटात वरुणने शानदार ड्रॅग फ्लिकवर गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. वरूणचा प्रहार इतका जोरदार होता की, विरोधी खेळाडूंसह गोलकिपरला देखील चेंडू रोखता आला नाही. वरुणच्या या अप्रतिम गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वरुण कुमारने ऑलिम्पिक करियरमध्ये पहिला गोल करत आपली प्रतिभा दाखवून दिली. भारताकडून वरुण, विवेक सागर, हरमनप्रीत यांनी प्रत्येकी एक -एक गोल केलं. २६ वर्षीय वरुणचा हा ऑलिम्पिकमधील डेब्यू सामना होता. वरुण कुमार हॉकी इंडिया लीग आणि भारतीय राष्ट्रीय संघात पंजाब वारियर्ससाठी डिफेंडर म्हणून खेळतो. वरुणचा जन्म पंजाबमध्ये झाला. त्याने २०१२ मध्ये ज्यूनियर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये पंजाब राज्याचे प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी करत आपली छाप सोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here