अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवशी रिलीज झाले ‘केजीएफ 2’ चे नवे पोस्टर

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : ‘केजीएफ 2’ हा चित्रपट बहुप्रतीक्षित आहे. सुपरस्टार यशची प्रमुख भूमिका असेल्या या चित्रपटात संजय दत्तसह श्रीनिधी शेट्टी, रविना टंडन यांच्याही भूमिका आहेत. प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केलेला ‘केजीएफ 2’ हा चित्रपट विजय किरागंदूर यांची निर्मिती आहे.

विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी संजय दत्तच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे 29 जुलै 2019 रोजी केजीएफ2 मधील अधिराच्या फर्स्ट लूकची घोषणा झाली होती. त्यावेळी पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते.

संजय दत्तच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘केजीएफ 2’ चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरने अनावरण करण्यात आले आहे. या पोस्टरवर संजय दत्त भूमिका साकारत असलेल्या ‘अधिरा’ या व्यक्तीरेखेचा करारी फोटो पाहायला मिळतो. संजय दत्त यात खलनायकाची भूमिका करीत आहे. हे पोस्टर समिक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे.

संजय दत्तनेही वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. ” ‘केजीएफ 2’ मध्ये काम करीत आहे ती कमालीची गोष्ट आहे. खूप काळापासून या सिनेमाच्या रिलीजची प्रतीक्षा करीत आहात याची मला कल्पना आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुमची ही प्रतीक्षा योग्य होती.”, असे संजय दत्तने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here