मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : कधीकाळी जगात प्रसिद्ध असलेल्या आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या राजबिंड्या आशियाई वाघांची संख्या दिवसागणिक कमी होत असून, अशीच स्थिती राहिली, तर वाघ नामशेष होण्याची भीती तज्ज्ञांद्वारे व्यक्त करत असतात.
शंभर वर्षात पृथ्वीवर असलेल्या एकूण वाघांपैकी ९७ टक्के वाघांचा बळी मानव समुहाने घेतला आहे. हा वेग असाच कायम राहिला तर आणखी पाच वर्षात मार्जार जातीचा हा देखणा प्राणी पूर्णपणे नामशेष होईल. याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ जुलै हा दिवस ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पहिले प्रेम म्हणुन त्यांच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला ओळखले जाते. आज जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी स्वतः काढलेले वाघाचे मोहकक्षणांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
Enthralling moments captured 📸 by
Chief Minister Shri. Uddhav Balasaheb Thackeray.#InternationalTigerDay pic.twitter.com/VGVr9gR315
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 29, 2021
राज्यात जितके वाघ आहेत त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक वाघ हे एकट्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत आणि तेवढेच वाघ हे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात आहेत. त्यामुळे वाघांचे संवर्धन करण्यात प्रशासन यशस्वी ठरले मात्र जसजशी वाघांची संख्या वाढली तसा मानव-वन्यजीव संघर्ष देखील वाढला आहे.






