वृत्तांकनात प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीने घेतली हायकोर्टाकडे धाव

चुकीचे वृत्तांकन करणाऱ्या २९ मीडिया कर्मचार्‍यांवर आणि मीडिया हाऊसविरूद्ध मानहानीचा खटला

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आता पोर्नोग्राफी प्रकरणात चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

दरम्यान, पोर्नोग्राफी प्रकरणी अटकेत असलेला व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या जामीन अर्जाची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोर्नोग्राफी प्रकरणात ‘तिची प्रतिमा मलिन करणारे चुकीचे रिपोर्टिंग केली आणि तिची बदनामी केल्याप्रकरणी’ २९ मीडिया कर्मचार्‍यांवर आणि मीडिया हाऊसविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

या प्रकरणात तिचा पती राज कुंद्रा याच्यावर आरोप आहे. उद्या या प्रकरणात सुनावणी होणार आहे. राज कुंद्रांचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्रांच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here