इचलकरंजी नगरपालिका प्रशासकीय अधिकारी निवृत्ती गवळी सेवानिवृत्त

इचलकरंजी (सहसंपादक मनोज सोनवले) : इचलकरंजी नगरपालिका प्रशासकीय अधिकारी निवृत्ती गवळी शुक्रवारी (दि.३०) सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कर्तृत्ववान, कर्तव्यनिष्ठ, साधी-सरळ राहणी..शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजी नगरपालिका. प्रशासकीय अधिकारी निवृत्ती गवळी यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा समारंभप्रसंगी.शाल..श्रीफळ..पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्य सुख-समृद्धी,आरोग्यमय जावो,अशा शुभेच्छा देण्यात आले.

nivrutti-gavali

इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा..तानाजी पोवार यांच्यासोबत ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश मोरबाळे, मा.उपनगराध्यक्ष रवि रजपुते, कॉ.सदा मलाबादे, कर अधिक्षक आरिफा नुलकर, श्री.गवळी यांचे विश्वासक किरणजी कोकाटे, प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी सौ.नम्रता गुरसाळे, टॅक्स विभागांतील दिपक खोत, धनंजय पळसुले, ऑडीट विभाग सुनिल बेलेकर, हरि माळी तसेच नगरपालिका प्रशासनातर्फे सर्व खात्यांतील प्रमुख..कर्मचारी..यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here