सांगली (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी शिरोळ तालुक्यात येऊन शिरोळ व नृसिंहवाडी या गावांना भेटी देत पूर परिस्थितीचा आढावा घेतला व येथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही देत महापुरामुळे नुकसान झालेल्यांना शासन नुकसानभरपाई देण्यासाठी लवकरच धोरण जाहीर करेल असे सांगितले.
यावेळी नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या व्यथा मुख्यमंत्र्यां समोर मांडल्या, नामदार हसन मुश्रीफ, नामदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, विशेष पोलीस महानिरीक्षक एस. एम. लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, यांच्या सह शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.






