पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : महाराष्ट्रात दिवसेंदिवस सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक घटना खारघर सेक्टर 12 मध्ये घडली आहे.
गुरुवार दि. 29 जुलै रोजी खारघर सेक्टर 12 मध्ये थकीत वीज बिल न भरल्यामुळे घराचे लाईट कट केल्यामुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ व धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
महावितरणचे खारघर येथील प्रधान तंत्रज्ञान कृष्णकांत गायकवाड आणि कर्मचारी विजय पाटील व नीलकंठ पवार हे सेक्टर 12 खारघर येथील सतीश मोहिते यांच्या घरी गुरुवारी दुपारी 1.30 च्या दरम्यान थकित वीज बिल वसुली करता गेले होते. त्यावेळी सतीश मोहिते यांनी कृष्णकांत गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचारी विजय पाटील आणि नीलकंठ पवार यांना बलप्रयोग करून ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ आणि धमकी दिली.
सतीश मोहिते यांच्याविरोधात खारघर पोलीस स्टेशन मध्ये सरकारी कर्मचाऱ्यावर कर्तव्य बजावत असताना कामात अडथळा निर्माण करत शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपनिरिक्षक नरेद्र बेलदार करीत आहेत.






