इचलकरंजी मुख्याधिकारी व प्रांताधिकाऱ्यांना दिले शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनी निवेदन
इचलकरंजी (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : यंदा इचलकरंजी शहरात आलेल्या महापुरामुळे गावभाग, जुना चंदुर रोड, बरगे मळा, मरगुबाई मंदिर परिसर, पि.बा.पाटील मळा, जय भवानी परिसर, चांदणी चौक येथील अनेक लोकांना आपली घरे सोडून इतरत्र स्थलांतरित व्हावे लागले आहे. परिणामी काहींनी नगरपरिषदेच्या छावणीचा आसरा घेतला तर काहींनी 2019 च्या पूराचा अनुभव पाहता, आपले नातेवाईक पाहुणे व मित्रमंडळींच्या घरी आश्रय घेतला आहे. दरम्यान नगरपरिषद प्रशासनामार्फत पूर परिस्थितीचे सर्वेक्षण 📋 होत असताना केवळ नगरपालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या छावण्यांमधील पूरग्रस्तांची नोंद घेतली जात आहे.
मात्र ज्या पूरग्रस्त नागरिकांनी आपले नातेवाईक व मित्र मंडळींच्या घरी ज्यांनी आश्रय घेतला आहे अशा लोकांचे देखील या पूरग्रस्तांच्या सर्वेक्षण यादीमध्ये नाव तात्काळ समाविष्ट करावे.याबाबतचे निवेदन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले, नगरसेवक रवींद्र लोहार, आबा जावळे (संपादक दै. राष्ट्रगीत) व नगरसेविका सौ. तेजश्री अमृत भोसले यांनी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल व प्रांताधिकारी / शिरस्तेदार गायकवाड यांना दिले आहे.

याबाबत पालिका प्रशासन सकारात्मक भूमिका घेत पूरग्रस्तांनावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. सर्व पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करू असे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल व प्रांताधिकारी / शिरस्तेदार गायकवाड यांनी सांगितले आहे.






