कन्नड (तालुका प्रतिनिधी प्रदीप मोरे) : औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी प्रशसंनीय व उल्लेखनिय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या कामगिरी बाबत त्यांना मंगळवार दिनांक 27/07/2021 रोजी मासिक गुन्हे आढावा बैठकी दरम्यान प्रशस्ती पत्र देवुन त्यांचा गौरव व अभिनंदन करून त्यांचे पाठीवर आज कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे.
यामध्ये पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या अभिन्न या उपक्रमांची निवड Federation of Indian Chambers of Commerce and Industry, New Delhi यांनी करून त्यांचा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पातळीवरील FICCI SMART POLICING AWARD – 2020 ( फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार -2020 ) हा पुरस्कार दिनांक 20/03/21 रोजी देण्यात आला होता. या पुरस्कारचे श्रेय हे “अभिन्न” टीम मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. पोलीस अधीक्षक यांनी दिले आहे. अभिन्न हा उपक्रम राबिवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या पुढील पोलीसअधिकारी व अंमलदार यांचे प्रशसांनपत्र देऊन गौरव करण्यात आला यामध्ये श्री. गोरख भामरे, सहा, पोलीस अधीक्षक, पैठण, श्री. डॉ. विशाल नेहूल, एस.डी.पी.ओ. औरंगाबाद ग्रा. पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, भगिरथ देशमुख, संतोष खेतमाळस, महेंद्र मोहोळ, सहा. पोलीस निरीक्षक अजित विसपुते, अनमोल केदार, गणेश सुरवसे, पोलीस अंमलदार कृष्णाई शिंदे, पैठण, रत्नमाला राऊत बिडकीन, सोनाली कुंदे, बिडकीन, सारीका जाधव , सिल्लोड शहर, लंका ढोले, सिल्लोड ग्रा. शोभा वाकीकर, अजिंठा, आरती गांवडे खुलताबाद, कावेर जाधव गंगापुर, जकिया शेख, देवगाव रं, सुनिता गोरे, कन्नड ग्रा, योगिता थोरात, जि.वि.शा, मिनाश्री भालेराव, नियंत्रण कक्ष, सविता चव्हाण, आगुशा, ताराचंद गव्हाणे पैठण, सुनिल ढेरे, पिशोर, रवि दाभाडे चिकलठाणा, जितेंद्र बोरसे आगुशा, सरला जाधव, चिकलठाणा, मुकूंद नाईक, पैठण यांचा समावेश होता.

तसेच दिनांक 21/02/21 रोजी औट्रम घाट गवताळा येथे जाफ्राबाद ते मालेगाव जाणारी बस ही वळण घेताना कठडा तोडून दरीच्या दिशेने लटकत होती ही घटना पोलीस अंमलदार सुशिलकुमार बागुल व पंढरी इंगळे यांचे निदर्शनास आली त्यांनी तात्काळ अपघात ग्रस्त बसकडे धाव घेऊन यातील 16 प्रवाशांना बस मधुन सुखरूप बाहेर काढले या त्यांच्या साहसाबद्दल त्यांचा मा. पोलीस अधीक्षक यांनी प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे.
याचप्रमाणे दिनांक 18/02/21 रोजी लासुर स्टेशन येथे रेलरोको आंदोलना दरम्यान एक आंदोलक हा अनावधानाने रेल्वे रूळाचे लागुन उभा असतांना जनशताब्दी एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्मच्या दिशेने येत असतांना पोलीस अंमलदार दादाराव तिडके यांनी प्रसंगावधान राखुन त्या आंदोलकास रेल्व रूळावरून बाजुला करून त्यांचे जिवीताचे स्वत:चे प्राण पणाला लावुन संरक्षण केले या त्यांचे निर्भय व धाडसी वृत्तीचे मा. पोलीस अधीक्षक यांनी प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे.
तसेच नॅशनल सेक्युरेटी गार्ड, दिल्ली यांचे द्वारे आयोजित एन.एस.जी. टी.ओ.टी. हा अत्यंत कठीण कोर्स मध्ये पोलीस अंमलदार रामचंद्र मात्रे यांनी महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळवून औरंगाबाद ग्रामीण पोलीसांचे नाव राज्यस्तराव झळकावले. तसेच राज्यस्तरीय पावर लिफिंटींग स्पर्धेत 564 किलो वजन उचलुन पोलीस अंमलदार आजिनाथ शेकडे यांनी तृतीय क्रमांकसह कांस्यपदक मिळविले तर पोलीस अंमलदार रविंद्र साळवे यांनी विभागीय स्तरावरिल पावर लिफिंटींग स्पर्धेत 560 किलो वजन उचलुन प्रथक क्रमांकसह सुर्वण पदक पटकावले. पोलीस ठाणे करमाड येथील पोलीस अंमलदार संदीप रमेश जाध व यांनी जंगलात तिन दिवसापासुन भरकटलेल्या व उपाशी असलेल्या मनोरूग्ण महिलेची माहिती मिळताच सुखरूप तिला जंगलाचे बाहेर आणुन तिच्या नातवाईकांचा शोध घेवून तिला तिच्या कुटूंबात परत पाठविले तसेच पोलीस अंमलदार संतोष पाटील यांनी तंटामुक्त बांध हा उपक्रम यशस्वीपणे राबवून 27 अत्यंत जुने वाद हे सामंजस्याने सोडविले आहे. पोलीस ठाणे सोयगाव येथील अंमलदार रोहन शिंदे हे वाहतुक नियमन बंदोबस्त करत असतांना 65 ते 70 वर्षाचे वयोवृध्द दोन्ही डोळयांनी अंध असलेल्या महिला हिला वर्दळीचा शिवाजी चौक हा वाहनामुळे ओलांडण्यात येत नव्हता त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सदर महिलेच्या मदतीला धावत जावुन त्यांना सुखरूप रस्ता ओलांडून देऊन बँकेत नेऊन सोडले होते. याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सी.सी.टी.एन.एस. प्रणालीची कामगिरीत औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दल सलग राज्यात…






