तेली समाजातर्फे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व अहमदनगर जिल्हा तेली समाज परिसंवाद यात्रा समितीच्या वतीने शुक्रवार दि.27/7/2021 रोजी शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात शिर्डी शहारातील सर्वे क्र 7 ,मातोश्री नगर , कालिका नगर , गायकवाड वस्ती , संताजी कॉलनी तसेच कुमार स्वामी आश्रम लेन गणेश कॉलनी येथील व शिर्डी शहरातील गावठाण व वाड्या , वस्त्यां अंतर्गत रस्त्यावर जिथे पथदिवे नाहीत अशा रस्त्यावर पथदिवे बसविण्याकामी तसेच शिर्डी शहरातील अनेक अंतर्गत रस्त्याचे काम करून डांबरीकरण करण्यात आले , परंतु शहरातील अनेक वाड्या , वस्त्यांवर आजपर्यंत रस्ता असूनही पथदिवे बसविण्याचे काम अपूर्ण आहे, रात्रीच्या वेळी अंधारात नागरिकांना , महिला व शालेय विद्यार्थी यांना ये जा करावी लागते अश्या परिस्थितीत घरफोडी, चोरी , छेडछाडीच्या तक्रारी वाढल्या आहेत , अनेक रस्त्यांवर जुगारी व दारुड्यांनी अड्डा बनवल्याचे निदर्शनास आले असून त्याचा आता स्थानिक रहिवाश्यांना त्रास होत आहे, पथदिवे बसवल्यास असे प्रकार कमी होण्यास मदत मिळेल व अंधाराचा गैरफायदा घेऊन होणारी घरफोडी , चोरीस आळा येईल त्यामुळे लवकरात लवकर शिर्डी शहरातील अंतर्गत रत्यास पथदिवे बसविण्यात यावे यासाठी सदर जाहीर निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.nagar-teli-samaj

यावेळी शिर्डी शहराचे नगराध्यक्ष श्री.शिवाजीभाऊ गोंदकर यांना शहरातील मातोश्री नगर, कालिका नगर, गायकवाड वस्ती , संताजीनगर येथे त्या ठिकाणी पथदिवे बसविण्यात यावी व ग्रामस्थांच्या अनेक तक्रारीसाठी निवेदन देऊन अनेक समस्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी त्यांनी सदर विषय सभागृहात मांडून ठराव मंजूर करून घेण्याबद्दल आश्वासन दिले.

निवेदन देताना श्री साई संताजी बहुउद्देशीय संस्था शिर्डीचे अध्यक्ष व माजी शिर्डी शहर तेली समाज अध्यक्ष व जिल्हा कोअर कमिटी सदस्य श्री यशवंतराव वाघचौरे अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे जिल्हा व अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेचे अध्यक्ष अॅड डॉ श्री विक्रांत वाघचौरे, जिल्हा निरीक्षक बद्रीनाथ लोखंडे तसेच शिर्डी शहर तेली समाज अध्यक्ष रवींद्र महाले, समाजसेवक दिलीप चौधरी, विजयराव चौधरी हे उपस्थित होते. दोन महिन्याच्या आत पथदिवे बसवले जाईल असे आश्वासन यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here