जनमत प्रतिष्ठान कडून गुणवंतांचा सत्कार

जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : जनमत प्रतिष्ठान कडून लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त तसेच अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा माननीय महापौर सौ जयश्री ताई सुनील महाजन यांच्या हस्ते पार पडला.

महापौर जयश्रीताई आपल्या भाषणात म्हणाले की सत्कार झाल्यानंतर सन्मान टिकवणे व पुढे यश प्राप्त करणे फार अवघड असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात एक ध्येय ठेवून आपल्या अभ्यासाची व भविष्याची एक रणनीती आखावी,, नगरसेविका सौ ,निता ताई सोनवणे यांनीही विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले.

प्रमुख उपस्थिती मध्ये नगरसेविका प्रतिभा देशमुख,सुचित्रा ताई महाजन,विवेक सोनवणे,, शुक्ला सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले ,गुणवंत पाटील, प्रतिभा मेटकर, संजय कुमार सिंग ,राजेंद्र वर्मा, विजय पाटील हर्षाली पाटील,सुनील सोनवणे,विशाखा वाणी ,वसंत कोलते,उपस्थित होते त्यानंतर पंकज नाले यांच्या वाढदिवसानिमित्त नाना पाटील सर व सुरेंद्र सिंग पाटील वृक्षारोपण व अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here