अलिबाग-सोगावकर : दि.३१जुलै, गोरगरीबांचे कैवारी असलेले अलिबाग उरण मतदार संघाचे स्वर्गीय माजी आमदार मधुशेठ ठाकुर यांचे १५ जुलै रोजी पहाटे निधन झाले,महत्त्वाचे म्हणजे त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता, ही बाब त्यांच्या प्रत्येक चाहत्यांना धक्का देणारी होती. आपल्या अश्या नेत्याची आठवण सतत तेवत राहो,त्यांचे विचार मनात कायम राहील याची काळजी त्यांचे कार्यकर्ते व चाहते घेत आहेत.यासाठी सोगांव विभागातील त्यांचे चाहते यांनी स्वर्गीय माजी आमदार मधुशेठ ठाकुर(पप्पा)यांच्या स्मरणार्थ द.लाईफ फाऊंडेशन ट्रस्ट मुंबई व डॉ.जी.डी.पॉल फाऊंडेशन वाय.एम.टी.डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत दंत चिकित्सा शिबीर ३१ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हा परिषद मराठी शाळा सोगांव येथे आयोजित केले होते.
दंत चिकित्सा शिबिराचे उदघाटन काँग्रेस नेते श्री.राजाभाऊ ठाकुर व रायगड ओ.बी.सी.सेल अध्यक्ष व मापगांव पंचायत प्रमुख श्री.सुनिल आप्पा थळे यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत मापगांव उपसरपंच वस्सीम कुर,सदस्या सानिका घाडी,सदस्य किशोर सातमकर, ज्येष्ठ नागरिक इक्बाल कुर,माजी उपसरपंच समद कुर,माजी सदस्या स्मिता राऊत,सतिश घाडी, सचिन घाडी,सलमान इक्बाल कुर,अक्षय जाधव तसेच पंचायत हद्दीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

दंत तपासणी करण्यासाठी द.लाईफ फाऊंडेशन ट्रस्ट व डॉ.जी.डी.पॉल फाऊंडेशन वाय.एम.टी.डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलचे १८ डॉक्टर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. उदघाटनिय भाषणात काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकुर यांनी पप्पांच्या स्मरणार्थ अश्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील राहीन,त्यासाठी आवश्यक ती मदत करायला तयार आहे, व आपले आरोग्य हे निरोगी कसे असावे यादृष्टीने मोलाचे मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत सर्वेसर्वा सुनिल आप्पा थळे यांनी सुध्दा आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्या,आदी असा मौलिक सल्ला दिला,तसेच कार्यक्रमाचे आयोजन करणारे उपसरपंच वस्सीम कुर सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व यांना सहकार्य करणारे मित्रमंडळ यांचे अभिनंदन केले.डॉक्टरांनी दातांबाबत व मौखिक बाबत होणारे गंभीर आजार याविषयी अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिली.ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात दंत चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे तपासणीसाठी आयोजकांना पर्यायाने अधिकचे वेळ वाढवावे लागले, यासाठी डॉक्टरांनीसुध्दा सहकार्य केले.कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे आयोजन उपसरपंच वस्सीम कुर व सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन घाडी यांनी केले होते,तर त्यांचे मित्र सलमान इक्बाल कुर,संतोष बांद्रे तसेच मित्रपरिवार यांनी अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय पाटील यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले.






