इचलकरंजी (महाराष्ट्र सहसंपादक मनोज सोनवले) : आज दि.२ ऑगस्ट रोजी स्टेशन रोडवरील “अरिहंत सिटी सेंटर”मधील “एस्.मार्ट” या रेडिमेड कपडे शॉपिंग मॉलचे उद्घाटन संपन्न झाले.
इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा.. तानाजी पोवार यांच्या शुभहस्ते करणेत आले. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांचे स्वागत व एस्.मार्ट. मधील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रेडीमेड कपड्यांची गुणवत्तेबाबत माहिती. इचलकरंजी शहरांतील प्रसिद्ध उद्योगपती संघवी मानकचंद ललवाणी व “अरिहंत सिटी सेंटर”चे प्रमुख उद्योगपती अरूणजी ललवाणी यांनी दिली.
याप्रसंगी सौ.सुशिलादेवी ललवाणी, सौ.श्व़ेता जैन, प्रित ललवाणी, तसेच एस्.मार्ट मधील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.






