कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : दि.१४ जुलैला अल्पवयीन मुलगी कारंजा येथुन बेपत्ता झाली त्याबद्दल ब्रिक्स मानव अधिकार कारंजा महिला सेल अध्यक्ष पुनम बंग सचिव रोशणी रेवाळे ,यांनी कारंजा पो.स्टे ला दिले निवेदन दिले आहे.
या निवेदनामधे मुलीच्या वडिलांनी पो.स्टे शहर ला तक्रार दाखल केली होती.त्या तक्रारीवर फीर्यातदार असंतृष्ठ असल्याचे निवेदन त्यांनी ब्रिक्स मानव अधिकार मीशन ला दिले . पोलीस निरीक्षक पो.स्टे कारंजा यांनी पदाधीकाऱ्यांना पो.स्टे ची कार्यवाही उचित दिशेने सुरू आहे चौकशीचा वेग वाढला अशी माहीती त्यांनी निवेदन देतांना दिली
यावेळी उपस्थीतांमध्ये विदर्भ महासचिव संदिप काळे,जिल्हाध्यक्ष राजेशसिंह ठाकुर,जिल्हामहासचिव संतोष टेकाडे,जिल्हाध्यक्ष व्यापारी सेल मोहन पंजवाणी,शहर अध्यक्ष तेजपालसींग भाटीया तालूका अध्यक्ष डॉ.अजय वाडेकर श.सचिव प्रसाद देशमुख,व्यापारी सेल अध्यक्ष प्रभाकर मुंगळकर,शहर उपाध्यक्ष भारत हांडगेसहसचिव राजेश अग्रवाल,सचिन कनोजे , अमीत नागवाणी,सुमीत नागवाणी,विवेक साबळे व आदी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.






