वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये नवा विक्रम

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : मुंबईच्या वांद्रे मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये १ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आली होती. वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात झालेल्या लोक अदालतमध्ये एकूण १९९८ प्रलंबित प्रकारणांपैकी ४२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी १९० प्रकरणे Negotiable Instruments Act, 1881 च्या कलम १३८ अंतर्गत तर इतर २३५ प्रकरणे आयपीसी च्या इतर कलमांच्या अंतर्गत निकाली काढण्यात आले.

वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या कोर्ट क्र. ५८ चे महानगर दंडाधिकारी श्री माणिक यदू वाघ यांनी काल एक दिवसीय राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल १,२८,०३,३९,४७३.२७ रुपये इतक्या रकमेच्या Negotiable Instruments Act, 1881 च्या कलम १३८ च्या प्रलंबित १२९० प्रकारणांमधील १९० प्रकरणे सामंजस्याने मिटवली. मुंबईत आज एका दिवसात राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून २९८३२ प्रकारणांमधील तब्बल ४,७९,९०,३४,७२०.७८ इतक्या रकमेचे ८७२८ प्रकरणे निकाली लावण्यात आली.

वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात कलम १३८ सह इतर अनेक IPC कलमांच्या प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला. कोर्ट क्र. ९ चे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी श्री पी एच खरवडे यांनी १७५ पैकी ७२ प्रकरणे निकाली काढली. कोर्ट क्र. ३२ च्या महानगर दंडाधिकारी श्रीमती ए एम शहा यांनी २१३ पैकी ४१ प्रकरणे निकाली काढली. कोर्ट क्र. ७१ च्या महानगर दंडाधिकारी पी बी येर्लेकर यांनी १५४ पैकी ५१ प्रकरणे निकाली काढली तर कोर्ट क्र. १२ चे महानगर दंडाधिकारी श्री के सी राजपूत यांनी १६६ पैकी ७१ प्रकरणे निकाली लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here