शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावरील ‘अदानी बोर्ड’ उखडून फेकला

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : येथील आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या एअरपोर्टचे संचालन आता अदानी ग्रुपकडे आहे.

अदानी ग्रुपने विमानतळाबाहेर अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावल्याने, शिवसैनिकच्या भावना खवळल्या आणि त्यांनी एअरपोर्टवर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट’च्या बोर्डची तोडफोड केली.

शिवसेनेने आरोप केला आहे, की आधी हे एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नावाने ओळखले जात होते. मात्र आता येते अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला आहे. यामुळे हे सहन केले जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here