सोशल मिडीयावर रंगलीय रिंकू राजगुरुच्या साडी लूकची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : सैराट चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिध्द झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सातत्याने सोशल मिडीयावर वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. आता सोशल मिडीयावर तिने शेअर केलेल्या साडीतील फोटोमुळे ती चर्चेत आहे.

रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

रिंकूने टाकलेले हे साडीतील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. नवीन लुकमधील हे फोटो पाहून नेटकरी तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. सैराट व्यतिरिक्त रिंकूने ‘कागर’ चित्रपटात , हॉटस्टारवरील ‘१००’या हिंदी वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत झळकली होती. लॉकडाउनच्या दरम्यान रिंकू ‘छूमंतर’ या आगामी द्विभाषिक सिनेमाचे शूटिंग करण्यासाठी लंडनला गेली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here