अंतिम फेरीत सहाव्या क्रमांकावर मानावे लागले समाधान
टोकियो : भारताची नॅशनल रेकॉर्ड ब्रेकर भारतीय महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौरनं आपल्या कामगिरीतलं सातत्य आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र कमलप्रीत कौरच्या पदरी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत निराशा पडली आहे.
अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीमध्ये कमलप्रीत कौरनं तिन्ही प्रयत्नांमध्ये ६० मीटरच्या वरची कामगिरी केल्यामुळे तिचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झालं होतं. त्यामुळे भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अजून एका पदकाची मोठी आशा निर्माण झाली होती.अंतिम फेरीतील १२ स्पर्धकांमध्ये कमलप्रीत कौरला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. अमेरिकेच्या व्ही. ऑलमनला सुवर्ण, जर्मनीच्या के. पुडेन्झला रजत, तर क्युबाचा व्हाय. पेरेजनं कांस्य पदक पटकावलं.






