प्रा.मंगेश पाटील व यांची सकल मराठा समाज तालुका सचिव पदी निवड.शहराध्यक्ष पदी दिलीप पाटील..

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : महाराष्ट्र प्रदेश सकल मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष अँड.बापूसाहेब जाधव यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र सचिव रवींद्र धुमाळ कोल्हापूर यांनी जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी धरणगाव येथील मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी एम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव नगरपरिषद येथे आज दि. ४ ऑगस्ट २०२१ रोजी प्रा. मंगेश प्रल्हाद पाटील यांची सकल मराठा समाज तालुका सचिव पदी तर, शहर कार्यकारिणी खालीलप्रमाणे – शहराध्यक्ष – दिलीप जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष – प्रकाश चिंधु पाटील, संघटक – आनंद अरुण पाटील, कार्यकारिणी सदस्य नगराज वना पाटील यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी नवनिर्वाचित सदस्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष पी.एम.पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन,युवासेना प्रमुख संतोष महाजन,न.पा.गटनेते विनय भावे,लोकशाही वृत्तपत्राचे संपादक भरत चौधरी,पत्रकार बाळासाहेब जाधव,विनोद रोकडे,निलेश पवार,लक्ष्मण माळी,योगेश पी.पाटील,उद्योगपती वाल्मिकराव पाटील,प्रशांत देशमुख,प्रकाश पाटील,दिलीप पाटील,कमलेश बोरसे, नगराज पाटील,नामदेव मराठे, अरविंद चौधरी,पुंडलिक पाटील, राजेंद्र वाघ आदी मित्र परिवार उपस्थित होते.

dharangaon-maratha-samaj

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here