रौप्यपदक विजेत्या रवी दहियावर बक्षिसांचा वर्षाव : हरियाणा सरकारकडून ४ कोटी रुपये, नोकरी, गावात स्टेडियम

नवी दिल्ली : हरयाणातील सोनीपत जिल्ह्यातील जवळपास १५ हजार लोकसंख्येचे नाहरी गावातून थेट ऑलिम्पिक पदकापर्यंत झेप घेणाऱ्या रवीला हरयाणा सरकारने आता गावामध्ये कुस्तीचं इनडोअर स्टेडियम बांधून देणार असल्याची घोषणा केलीय.

एक रौप्य आणि तीन कांस्यपदकं जिंकल्यानंतर पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची आशा भारताला होती. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा समाना करावा लागला. रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. मात्र असं असलं तरी रवीने केलेली कामगिरी ही ऐतिहासिक ठरली असून आता त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होताना दिसत आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार रवीला आता क्लास वन कॅटेगरीची सरकारी नोकरीही दिली जाणार आहे. तसेच त्याला हरयाणामध्ये हव्या त्या ठिकाणी ५० टक्के सवलतीमध्ये जमीनही देण्यात येणार आहे. रवीच्या नाहरी गावामध्ये कुस्तीसाठी विशेष इनडोअर स्टेडियम उभारलं जाणार आहे. त्याशिवाय रौप्यपदक विजेत्याला चार कोटी रुपये सरकारकडून देण्यात येणार असल्याची ऑलिम्पिकपूर्वीच केलेल्या घोषणेनुसार रवीला ही चार कोटींची रक्कमही दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here