गोगरामधून भारत-चीनचे सैनिक मागे फिरले

नवी दिल्ली : भारत-चीनमधील सैन्यदलामध्ये चर्चेची ऑगस्टमध्ये १२ वी फेरी झाली. ही चर्चेची फेरी विधायक झाल्याचे भारताच्या बाजूने विधायक झाल्याचे दोन्ही देशांच्या संयुक्त निवदेनात म्हटले आहे. भारत-चीन दोन्ही देशांमधील बैठक ही परस्पर सामजंस्याची होती. दोन्ही देशांनी पूर्वसंमतीने आणि प्रोटोकॉलप्रमाणे उर्वरित वाद त्वरित सोडवावेत, असे दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.

भारत आणि चीनच्या सैन्यदलातील १२ व्या चर्चेच्या फेरीची फलनिष्पत्ती दिसू लागली आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीनच्या सैनिक मागे फिरले आहेत. दोन्ही देशांनी पाँईट १७ ए म्हणजे गोगरा येथील गस्त टप्प्याटप्प्याने, समनव्याने आणि पडताळणी करून थांबविल्याचे भारतीय सैन्यदलाने म्हटले आहे.

दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया ५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. दोन्ही देशांचे सैनिक हे त्यांच्या कायमस्वरुपीच्या तळावर पोहोचले आहेत. दोन्ही देशांनी तात्पुरते केलेल्या पायाभूत सुविधा परस्पर सामंजस्याने पडताळणी करून उद्धवस्त केल्या आहेत. गतवर्षी दोन्ही देशांचे सैनिक पूर्व लडाखमध्ये समोरासमोर उभे ठाकले होते. त्यापूर्वी जी स्थिती होती, तशी स्थिती झाल्याचे सैन्यदलाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here