चंदीगढ : येथील मोहाली सेक्टर ७१ मधील कम्युनिटी सेंटरजवळ अकाली दलाच्या युवानेता विक्की मिड्डूखेडा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. ही हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. भरदिवसा बेछूट गोळीबार करून हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
विक्की मिड्डूखेडा हा अकाली दलाचे नेते अजय मिड्डूखेडा यांचा लहान भाऊ आणि एसओआय विद्यार्थी संघटनेचा सदस्य होता. विक्कीचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. पंजाब युनिव्हर्सिटीतमध्ये विक्कीचा काही लोकांसोबत वाद सुरु होता, असे समजल्याने, त्यादृष्टीने पोलिस चौकशी करत आहेत.
4 assailants chased Vicky Middukhera down and fired about 8-9rounds, killing him on the spot. Investigation is underway: Satinder Singh, Senior Superintendent of Police, Mohali pic.twitter.com/RVmb3K80LX
— ANI (@ANI) August 7, 2021
सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार ४ आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले होते. त्यांनी ९ राउंड फायर करून विक्की मिड्डूखेडाची हत्या केली. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. जखमी अवस्थेतील विक्कीला तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीसांनी मोहालीसह चंदीगढ, पंचकुला सीमेवर नाकाबंदी केली आहे.






