नवी दिल्ली : नंद नगरी भागात एक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अग्निशमन जवानांकडून बचाव कार्य सरु असून इमारत दुर्घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून बचाव कार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखालून दोन जणांना सुखरुपरित्या बाहेर काढलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
A building collapses in Nand Nagri area of Delhi. Three fire tenders are present at the spot. Details awaited. pic.twitter.com/pWAAHR8u2M
— ANI (@ANI) August 7, 2021
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध मोहीम सुरु आहे.






