बेलावडे येथे नियोजित स्मशानभूमीत वृक्षारोपण

जावली (प्रतिनिधी) : ग्रामस्थ मंडळ व ग्रामपंचायत बेलावडे यांचे वतीने नियोजित स्मशानभूमी शेजारी मोकळ्या जागेत वड , पिंपळ , आंबा इत्यादी वीस वृक्षांचे रोपण करण्यात आले .

बेलावडे येथे गेले अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नव्हती प्रत्येक ग्रामस्थ आपापल्या शेतामध्ये घरातील व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करत होते त्यामुळे पै पाहुणे , आप्तेष्ट मंडळी स्मशानभूमी नसल्याने सतत हिणवत असत त्यामुळे नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी मनावर घेऊन नूतन ग्रामपंचायत सदस्य मोहन शिंदे यांनी स्वतः ची जागा गावाला स्मशानभूमी साठी विनामोबदला दान दिली .

दरम्यान नुकतेच गावचे जेष्ठ नागरिक देवराम गणपत शिंदे यांचे दुःखद निधन झाले त्यांचा दशक्रिया विधी आज संपन्न झाला त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ कुटुंबातील लोकांनी स्मशानभूमीत झाडे लावून काही अस्तिचें विसर्जनही रोपांच्या मुळाशी करून मृत व्यक्तींच्या आठवणी झाडांच्या व सावलीच्या माध्यमातून जतन करण्याचा क्रांतिकारी विचारांचा आदर्श समाज्यापुढे निर्माण केला .

याप्रसंगी बापूराव गायकवाड गुरुजी, विलासराव शिंदे, सुभाषराव शिंदेसर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे, राजे प्रतिष्ठानचे नितीनदादा शिंदे, कृषिउत्पन्न बाजार समितीचे सदस्य हणमंत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मोहन शिंदे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here