प्रहार जनशक्ती पक्षाकडून या घटनेची योग्य चौकशी करण्यात यावी याकरिता आरोग्य अधिकारी कारंजा यांना निवेदन
कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : कारंजा लाड तालुक्यातील लॉक डाऊन काळामध्ये आशा वर्कर यांच्याकडून स्टेशनरीच्या साहित्यसाठी लागणाऱ्या वस्तूं करिता आशा वर्कर कडून तब्बल 1200 रुपयाची लाच घेतली व आशा वर्करला फक्त 1 लेटर बुक दिल्यामुळे आशा वर्कर मध्ये तीव्र निराशा व्यक्त होत आहे. त्यामुळे कारंजा लाड तालुक्यातील आशा वर्कर यांनी प्रहार जनशक्ती पक्षकडे धाव घेऊन आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा या करिता विनंती केली.
त्यांच्या विनंतीवरून प्रहार जनशक्ती पक्षाकडून तालुका आरोग्य अधिकारी कारंजा लाड यांना निवेदनाच्या माध्यमातून याप्रकरणाची योग्यरीत्या चौकशी करण्यात यावी व या चौकशीमध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक मा. महेश भाऊ राऊत, भारत भाऊ भगत, गोविंद तुमसरे, अनिकेत डोंगरे, अनिकेत सावळे, शिवा वरठी, प्रकाश इंगळे,बाळू कुराडे, ज्ञानेश्वर बावने,श्रीकांत ठाकरे,उमेश कडू , खुशाल पाटील, गणेश सराफ , गौरव जमाले, सागर ठाकरे, व समस्त प्रहार सेवक उपस्थित होते.






