सातारा (प्रतिनिधी) : येथील पोलिस दलात कोरेगाव डिव्हीजनला डीवायएसपी म्हणून कार्यरत असलेल्या गणेश किंद्रे यांची पोलीस बॉईज असो.चे सातारा जिल्हाप्रमुख प्रकाश गायकवाड यांनी फलटन शहर पोलीस स्टेशनमध्ये सदिच्छा भेट घेतली.
या भेटीबाबत सांगताना प्रकाश गायकवाड म्हणाले की, आमच्या कार्याला मार्गदर्शन देणारे आधारस्तंभ डीवायएसपी गणेश किंद्रे यांना भेटून बरे वाटले. साहेबांच्या कार्यातून नेहमीच आम्हांला खाकीत दडलेला देवमाणूस दिसत असतो.






