ग्रामीण भागातील रस्ते विकास कामांना तब्बल ६० लाख रुपयांचा निधी मंजूर

मदन कारंडे यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर (महाराष्ट्र सहसंपादक मनोज सोनवले) : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे साहेब यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 25/15 योजनेअंतर्गत तब्बल 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यामध्ये तारदाळ गावासाठी 30 लाख रुपयांचा निधी, कबनूर गावासाठी 15 लाख रुपयांचा निधी, कोरोची गावासाठी 15 लाख रुपयांचा निधी, 2020-21 च्या अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद केली असून लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात होणार आहे.

गावागांवामधील अंतर्गत रस्ते विकसित कामासाठी रस्ते डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण करणे, यासारख्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा व कामांसाठी या निधीचा उपयोग करता येणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील या गावांना मिळालेल्या या निधीमुळे ग्रामीण भागातील जनतेला तसेच तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजेच ग्रामपंचायतींना मूलभूत नागरी सुविधा पुरवणे शक्य होणार आहे.

कोरोनाच्या भयानक साथीमुळे राज्य सरकार प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जात असतानाही महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वाने सर्व प्रकारच्या विकासकामांना प्राधान्य देत सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज बापू पाटील, केडीसी बँकेचे संचालक भैय्या माने,इंगवले सरकार,कोल्हापूर गोकुळ दूध संघाचे संचालक नाविद मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, अमित गाताडे, तारदाळ मधील ग्रामपंचायत उपसरपंच सुधाकर कदम, तारदाळ ग्रामपंचायत सदस्य मंगला चौगुले,सुरेखा कांबळे,वैशाली साळुंखे,पाणीपुरवठा अध्यक्ष अशोक चौगुले,मनोज कांबळे,सुहास नर्मदे, कबनूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबासाहेब कोकणे, दीलावर पटेल, नितीन कामत, कोरोची मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री.पिष्टे, अभिनंदन पाटील,राहुल चव्हाण,नितीन लोहार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here