कोल्हापूर (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : महात्मा गांधी पुतळ्याजवळील अन्नधान्य वितरण कार्यालयांमध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये या कारागृहात ज्यांनी बंदिवास भोगला..त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ.. हुतात्मा स्मारकांस मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी “क्रांतीदिनानिमित्त” हार घालून इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा.. तानाजी पोवार यांनी अभिवादन केले.
त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते, अन्नधान्य पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे, सुकुमार पाटील, प्रविण गायकवाड. यावेळी उपस्थित होते.






