लायन्स क्लब व लिओ क्लबच्यावतीने चिपळूण पुरग्रस्तांना मदतीचा हात

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : लायन्स क्लब ऑफ शिर्डी व लिओ क्लब ऑफ शिर्डी यांच्या वतीने चिपळुण येथील पूरग्रस्तांना किराणा सामान व रोजच्या गरजेच्या वस्तू पाठवण्यात आल्या. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे झोनल चेअरपर्सन ला. डॉ. एकनाथ गोंदकर यांनी दोन्ही क्लबच्या सर्व सदस्यांना पूरग्रस्तांसाठी यथाशक्ति मदत करण्याचे आवाहन केले होते.

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही क्लबच्या सदस्यांनी किराणा सामान व रोजच्या गरजेच्या वस्तू जमा करण्यास सुरुवात केली. काही दिवसातच 140 किलो गव्हाचे पीठ, 50 किलो तांदूळ, 50 किलो रवा, 100 भांड्याचे साबण, 34 लिटर सोयाबीन तेल, 10 सतरंज्या, 10 चादरी, 120 मिनरल वॉटर बॉटल, किराणा किट, मेडिकल किट व जुने कपडे असे साहित्य जमा झाले. हे सर्व साहित्य लोणी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रभांजन भगत व चिपळूण येथील संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन यांच्यामार्फत चिपळूण येथील पूरग्रस्तांपर्यंत पोहोच करण्यात येणार आहे.

यावेळी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई चे अध्यक्ष ला. प्रा. सागर कुलकर्णी, सचिव ला. महेश वैद्य, खजिनदार ला. वसंत घुगे, ला. प्रा. रघुनाथ गोंदकर, ला. प्रा. सौ. रजनीताई गोंदकर, ला. विजय थोरात, ला. प्रा. गंगाधर वरगुडे, ला. सौ मनीषा वैद्य, लिओ क्लब ऑफ शिर्डी साई चे अध्यक्ष लिओ हर्ष पारख, सचिव साईश गोंदकर, खजिनदार दर्शन वैद्य, लिओ यश वालझाडे, लिओ ओंकार गोंदकर, लिओ कृष्णा गोंदकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here