माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियानातंर्गत उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील यांचे मार्गदर्शन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : माझे गाव कोरोना मुक्त गांव या शिवसेनेचे राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन धरणगाव तालुक्यातील प्रत्येक प.स.गटात शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले.

या मार्गदर्शनात प्रामुख्याने आपल्या गावात लसीकरण झाले आहे काय,कोरोना काळात मोफत रेशन मिळाले आहे काय,आधार कार्ड सर्वांकडे आहे काय, विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिक ग्रामस्थांना मिळत आहे काय,गावात आशा अंगणवाडी सेविका यांचा नेमणुका झाल्या आहेत काय,महाराष्ट्र शासनाच्या कर्ज मुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे काय अशी संपूर्ण माहिती देऊन महाविकास आघाडी सरकार करीत असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

या प्रसंगी जि.प सदस्य गोपाल बापू चौधरी,जि.प सदस्य प्रतापराव पाटील,सभापती प्रेमराज पाटील,प.स सदस्या सौ शारदा पाटील,आसाराम कोळी,अनिल पाटील तसेच ग्रामस्थ व शिवसैनिक यांनी आपापल्या गावातील माहिती दिली.

यावेळी बिलखेडाचे देविदास भदाणे,भोण्याचे समाधान पाटील,दीपक सोनवणे,अपंग महासंघाचे संजय पाटील,संजीव धामोळे,राजू चौधरी,दीपक भदाणे,पिंटू पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,नगरसेवक विजय महाजन,वासुदेव चौधरी,अजय चव्हाण,नंदू पाटील,अहमद पठाण,अमोल चौधरी,योगेश पी.पाटील,अरविंद चौधरी, किशोर भदाणे,गोलू चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here