कर्जत तालुक्यात जागतिक आदिवासी दिन साजरा

कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : कर्जत तालुक्यातील आदिवासी समन्वय समितीने ‘जागतिक आदिवासी दिन’ कर्जत तालुक्यातील मार्गाचीवाडी, पाथरज येथे साजरा केला. या प्रसंगी कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.

सर्वप्रथम वीर महात्म्यांना नमन करून, मनमोहक आदिवासी पारंपरिक नृत्य पार पडले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी मार्गदर्शन केले आणि सर्व आदिवासी बांधवांना ‘ जागतिक आदिवासी’ दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

karjat

या प्रसंगी आदिवासी समन्वय समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय हिंदोळा, उपसभापती जयवंतीताई हिंदोळा, उपाध्यक्ष बाळू बुरुड, सचिव विष्णू साबळे, सहसचिव सोमनाथ वाघमारे, सरपंच अंकुश घोडविंदे आणि सर्व आदिवासी समिती सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here