आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आयुर्वेद व योग प्रचार प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री. तांबे यांनी आरोग्यविषयक लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमतभगवद्गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here