हुतात्मा स्मारक उद्यानात क्रांती दिन साजरा

पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) :  इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे क्रांती दिन. पनवेल येथे हुतात्मा स्मारक उद्यानात क्रांती दिन साजरा करण्यात आला.

क्रांती दिना निमित्त महापालिकेच्या हुतात्मा स्मारक उद्यानात आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पनवेल क्षेत्रातील विविध स्वातंत्रवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल क्षेत्रातील स्वातंत्रवीरांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी,महिला-बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेविका चारूशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, नगरसेवक समीर ठाकूर ,माजी नगराध्यक्ष अशोक खैर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, पालिका अधिकारी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here