ताराराणी पक्ष कार्यालय इचलकरंजी येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला

इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : महापूरामुळे नुकसान झालेल्या शहर व परिसरातील पूरग्रस्तांना येत्या दोन दिवसात शासनाकडून जाहीर मदत मिळणार आहे. तर व्यवसाय, दुकाने, घरांची पडझड व शेतीचे पंचनामेही लवकरच पूर्ण करुन त्यांनाही आवश्यक ती मदत दिली जाणार आहे. तर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इमारती दुरुस्तीच्या 11 कोटी रुपयांच्या कामास लवकरच सुरुवात होत असल्याची माहिती ताराराणी पक्ष कार्यालय इचलकरंजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दिली.

नुकत्याच उद्भवलेल्या महापूरामुळे गावभागातील पूरक्षेत्रातील नागरिकांसह दुकाने, व्यवसाय, औद्योगिक क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने शासनाकडून मदत मिळावी यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे नेहमीच प्रयत्नशील होते. या पाठपुराव्याला यश आले असून नुकसानग्रस्त घरांच्या पंचनाम्याचे व काम पूर्ण झाले असून नुकसानीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाली आहे येत्या दोन दिवसात ही रक्कम त्या त्या नुकसानग्रस्त कुटुंबांना मिळणार आहे. तर लवकर दुकाने, यंत्रमाग कारखाने, औद्योगिक व्यवसायांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार असून लवकरच प्रत्यक्ष पंचनामे होऊन त्यांनाही मदत दिली जाणार आहे. पूर्ण पडझड झालेल्यांसाठी दीड लाख, 50 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त पडझड झालेल्यांसाठी 50 हजार तर 50 टक्क्यापेक्षा कमी पडझड झालेल्यांना 25 हजार रुपये दिले जाणार आहेत.tararani-paksh

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या इमारत दुरुस्तीसाठी मंजूर 11 कोटी रुपये खर्चाच्या कामाची सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली लवकरच या कामाला सुरुवात होत आहे. त्याचबरोबर रुग्णालयात अतिरिक्त 6 हजार लिटर व 20 हजार लिटर क्षमतेचे लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यासह ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे. सध्या रुग्णालयात 22 व्हेंटीलेटर कार्यान्वित असून पुणे येथील कंपनीमार्फत येथील स्टाफला आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे लवकरच सर्वच व्हेंटीलेटर उपयोगी ठरतील असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे म्हणाले.

तसेच शेळके मळा परिसरातील आवाडे सबस्टेशन जवळपास पहिल्या मजल्यापर्यंत उंची वाढवून त्यावर हे ट्रान्सफर बसविण्याचा निर्णय झाला आहे. वस्त्रोद्योगाला उभारी मिळावी, यासह प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक होऊन आवश्यक अनुदान व निधी लवकरच मिळेल व पूराची समस्या कायमस्वरुपी निकालात निघावी यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे नेहमीच प्रयत्नशील आहेत. सर्वच नद्यांतील गाळ व वाळू काढून नदी पात्राची खोली वाढविण्याची गरज आहे. त्याचबरोबर आवश्यक उपाययोजनाही तातडीने करण्यात याव्यात , असेही आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेस ताराराणी पक्षअध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, नगरसेवक सुनिल पाटील, आरोग्य सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक राजू बोंद्रे, प्रकाश मोरे, प्रकाशराव सातपुते, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सागर कम्मे, लक्ष्मण पाटील आदीसह पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here