जॉय सामाजिक संस्थेची महाड पूरग्रस्तांना मदत

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) : जॉय ऑफ गिविंग मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच महाड येथील शिंदे आली,दादली गाव व आसपासच्या जवळपास दिडशे कुटूंबियांना किराणा सामान किट,नवीन गारमेंट्स व वापरण्यासयोग्य कपडे वाटप करण्यात आले.मार्च 2020 पासून करोनाच्या पाश्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाउन पासून ते आजपर्यंत व लॉकडाउनपूर्वी जॉयच्या वतीने साधारण पाच हजार कुटुंबियांना किराणा किट,आरोग्य किट आणि इतर जीवनावश्यक वस्तू देऊन मदत करण्यात आली आहे.

महाड पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जॉय परिवारातील बहुतांश सभासदांनी सामाजिक जाणिवेतून पुढाकार घेऊन सहकार्य केले.तसेच प्रतापनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जोगेश्वरी आणि तेथील समस्त महिला वर्ग यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.मुंबईतील सामजिक कार्यकर्त्या स्वाती लाड,रश्मी पवार,संजना राजपूत,भाग्यश्री रावले यांनी हात आखडता न घेता सहकार्य केले.ही सर्व मदत वितरण करण्यासाठी महाड येथील आमचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते अजय खातू,खोडके बंधू आदींनी मोलाचे सहकार्य केले.

यापुढेही जॉयच्या वतीने असे सामाजिक कार्य सुरूच राहणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी यानिमित्ताने सांगितले,तर मदतीचे किट बनविण्यासाठी वैष्णवी टीबे आणि सहकारी यांनी आणि हे किट टेम्पोत लोड करण्यासाठी जोगेश्वरी येथील चॅम्पियन बॉईज स्पर्ट्स क्लब च्या कार्यकर्त्यानी खूप मेहनत घेतली.सकाळी महाडला निघण्यापूर्वी मा वसंत केळकर गुरुजी यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून व सर्वांच्या भल्यासाठी कामना करून प्रस्थान करण्यात आले.

किराणा किट प्रत्यक्ष महाडला जाऊन वितरण करण्यासाठी रमेश माळवदे,भूषण मुळे,मकरंद बाचल,चैतन्य मोळतकर,मीना भूतकर,मानसी बाचल पश्चिम रेल्वेचे गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त मोटरमन चंद्रशेखर सावंत,कैलास समुद्र,गणेश हिरवे आदी कार्यकर्ते जातीने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here