गाडीच्या डिक्कीत आढळला मृतदेह
तेलंगाणा : येथील मडक जिल्ह्यामध्ये भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास प्रसाद यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. ते त्याच्या कारने जात असतानाच अनोळखी व्यक्तींनी त्याची कार पेटवून दिली. यामध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी त्यांना त्याच्याच कारच्या डिक्कीमध्ये कोंडलं. त्यानंतर या लोकांनी गाडीला आग लावली. पोलिसांनी प्रसाद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
Telangana | A local BJP leader in Medak District died after he was set ablaze by unidentified persons. A case has been registered.
"Few persons set him on fire along with his car. We found his burnt body in the trunk of his car," said Chandana Deepti, SP, Medak (10.08) pic.twitter.com/wdmEyThavf
— ANI (@ANI) August 10, 2021
या शवविच्छेदन अहवालामधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवण्यास मदत होणार आहे. सध्या पोलीस उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास करत असून लवकरता लवकर आम्ही दोषींना अटक करु असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.






