हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळला डोंगरकडा

छील जंगलाच्या परिसरात झाली दुर्घटना : महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

किन्नूर : हिमाचल प्रदेशातील चौरा आणि किन्नूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून, राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांनी भरलेल्या एका बसवर दरड कोसळली आहे. या दरडीखाली अजूनही वाहने अडकल्याची शक्यता आहे.

या अपघातामध्ये एक डोंगर कडाच तुटून बसवर पडल्याने संपूर्ण बस या ढीगाऱ्याखाली सापडलीय. ही बस किन्नूरमधून हरिद्वारकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग पाचवर झालेली ही दुर्घटना छील जंगलाच्या परिसरात घडली आहे. या दुर्घटनेमुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.

या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. बसच्या चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं असलं तरी या ढिगाऱ्याखाली अनेक प्रवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या दरडीखाली बस बरोबर काही खासगी वाहनेही गाडली गेल्याची शक्यता आहे. खासगी वाहनांमधील काही लोक मदतीसाठी ओरडत होते असं स्थानिकांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here