नविन पनवेल पाणी प्रश्नावर शिवसेना आक्रमक…

सिडको ऑफिसवर मोर्चा नेऊन दिले निवेदन

पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) – नवीन पनवेल विभागात बरेच दिवसापासून  येथील नागरिक पिण्याच्या स्वछ पाण्याच्या उपलब्धतेच्या मूलभूत हक्क अधिकारापासून वंचित आहेत. त्याचा उद्रेक होऊन येथील महिलांनी नवीन पनवेल शिवसेना , युवा सेना व महिला संघटनेच्या नेतृत्वात सिडको ऑफिस नवीन पनवेल येथे पाणी विभागाचे अभियंता सागर जगदाळे यांच्या ऑफिस वर मोर्चा नेऊन आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे.

नवीन पनवेल येतील सेक्टर ६,९,१०,११ या ठिकाणी गढूळ पाणी येणे, पाणी पुरवठा नियमित न होणे , पाण्याचा अतिशय तुटवडा भासणे अशा अनेक समस्ययांबाबत  सिडको ऑफिस नवीन पनवेल पाणी विभागाचे अभियंता सागर जगदाळे यांच्या निदर्शनास आणून दिले. श्री. जगदाळे यांनी ह्या विषयावर उच्चपदास्थाशी विचार विनिमय करून विभागातील पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

panvel

या प्रसंगी यतिन देशमुख ( उपमहानगरप्रमुख – शिवसेना नवीन पनवेल व पनवेल), तसेच सौ. अपूर्वा प्रभू महिला शहर संघटिका, सौ सुगंधा शिंदे, संजय गोवेकर विभाग संघटक, ज्ञानेश्वर भंडारी उपशहर संघटक, राजेश वायंगणकर उपविभागप्रमुख, सीपी. प्रजापती ,युवासेना पदाधिकारी सिद्धेश गुरव, कैलास कांदळकर, जेष्ठ शिवसैनिक जयंत पाखरे तसेच सर्व शिवसैनिक, महिला आघाडी व युवासेना पदाअधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here