नाशिक (विशेष प्रतिनिधी) – सध्या संपूर्ण जगाला कोरोना च्या महामारीने लुटलय, त्यापैकीच या कोरोनाचा बळी ठरला तो बळीराजा दुष्काळ ,अतिवृष्टी, गारपीट, महापुर यांना तोंड देवुन शेती पिकविली पण कोरोना च्या संकटात तो परत सापडलाय प्रचंड मेहनतीने कांदा पिकविला पण आधी निर्यात बंदी,मग जीवनावश्यक मध्ये टाकला नंतर कोरोना च्या संकटात त्याची संपुर्ण चेन तुटली मार्केट बंद आहेत रेल्वे मालवाहतूक बंद आहेत त्यामुळे बाजारभाव कोसळत आहेत
चाळीत माल सडत आहे आणि जेव्हा कांदा भाव वाढल्यावर मिडीया जोर धरते प्रशासन आणि मंत्री यांना बारा हत्तीच बळ येते ते आता बाजार भाव पडले तर कोणत्या बिळात लपून बसले आहेत हे कळायला मार्ग नाही म्हणून कांदा उत्पादक संघ यांनी आंदोलनाच हत्यार उपसले प्रथमता व्टिटर नंतर पत्र लिहुन आणि आता थेट कृषी मंत्री आणि इतर मंत्रीमंडळ यांना थेट शेतकरी फोन करून कांदा बाजारभाव साठी विचारना करत आहेत कारण आता शेतकऱ्यांनी जागे होणं गरजेचं आहे त्यांचा लढा त्यांनाच लढावा लागणार आहे आपल्या मालाला मोल का मिळत नाही हे आपण आपल्या लोकप्रतिनिधींना विचारणे गरजेचं आहे तो लढा शेतकऱ्यांनी सुरू केलाय
कांदा उत्पादक संघ या माध्यमातून आणि या अनोख्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि कांद्याला किमान वीस रू किलो हमी भाव मिळावा अशी मागणी वर शेतकरी ठाम असुन येत्या काळात जर शासनाने योग्य पाऊल उचललं नाही तर मोठ्या स्वरूपात आंदोलन होईल असे कांदा उत्पादक संघ अध्यक्ष. भारत दिघोळे, कुबेर जाधव,जयदीप भदाणे,व्यंग चित्रकार किरण मोरे कृष्णा जाधव ,शैलेंद्र पाटील आणि तमाम कांदा उत्पादक सदस्य आणि शेतकरी यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेवुन राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून कांदा उत्पादकांच्या रास्त मागण्या बाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री , रेल्वेमंत्री ,वाणिज्य मंत्र्यांना भेटुन चर्चा करून जास्तीतजास्त कांदा खरेदी व निर्यात करावी म्हणुन दबाव वाढवला पाहिजे
– कुबेर जाधव ,,सपंर्क प्रमुख राज्य कांदा उत्पादक संघटना नाशिक
कांदा उत्पादक व पहार शेतकरी संघटनेचे संघटक किरण मोरे यांनी रेखाटलेले माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचं रेखाचित्र , कांदा उत्पादकांच्या व्यथा अधोरीखीत केल्या आहेत
Home उत्तर महाराष्ट्र नाशिक कांदा उत्पादकांच्या रास्त मागण्या बाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – कुबेर...







