धरणगाव (योगेश पी पाटील) – येथील नामांकित पहेलवान श्री गोविंदा दिलीप पाटील यांनी नुकताच शिवसेना प्रवेश केला.जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. ८०% समाजसेवा व २०% राजकारण या शिवसेनेच्या ध्येयधोरण काढून भविष्यात आपणही समाजाचे कार्य करून अन्यायाविरुद्ध सतत लढा देणाऱ्या सत्ता असो किंवा नसो ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहते कोरोनासारख्या विषाणू वर मात करण्यासाठी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटिल सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी,गटनेते पप्पू भावे,उपनगराध्यक्ष विलास महाजन, नगरसेवक वासु चौधरी,हे नेते.कोरोनाच्या प्रभाव सुरू झाला त्या दिवसापासून काही ना काही मदत करीत असतात त्यांच्या या कामावर मी प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे गोविंदा पाटील यांनी सांगितले.
त्याच्या छोटे खानी प्रवेश सोहळ्यास जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर,न.पा गटनेते पप्पू भावे,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,उपनगराध्यक्ष विलास महाजन,नगरसेविका अराधना पाटील,सौ मोनाली योगेश पाटील,कु.नेहा पाटील,रवींद्र कडरे,विजय अहिरे,धर्मा पाटील,सौ राजश्री पाटील,वसंत बाविस्कर,योगेश पाटील,सत्तार पटेल ,नंदू पाटील आदी उपस्थित होते.








