मुरुड तहसिलदार गमन गावीत यांना लाच घेताना पकडले

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : १५ हजारांची घेतली लाच

मुरुड (प्रतिनिधी सारिका माळी – शिंदे) : भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत आहे. इझी मनीचा मार्ग निवडून श्रीमंत होण्याकरिता कुठलाही शॉर्टकट निवडतात. त्यातीलच एक मार्ग म्हणजे लाचखोरी. कुळ वहिवाट कायद्याच्या जमिन फेरफार करण्यासंदर्भात 15 हजारांची लाच स्विकारताना मुरुड तहसिलदार गमन गावीत यांच्यासह दोन कर्मचार्‍यांना नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबतचे वृत्त असे की तक्रारदाराला आपल्या जमीनीच्या विक्रीसाठी त्यावर असलेले कुळ वहिवाटीचे 32 ग प्रमाणपत्रासाठी मुरुड तहसिलदार तथा शेतजमिन न्यायधिकार प्राधिकरणकडे मागणी करण्यात आली होती. त्यासाठी तक्रारदाराकडे मुरुड तहसिलदार गमन गावीत यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदाराने थेट नवीमुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधत तक्रार केली. त्यानुसार या तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईचे पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. बुधवार दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना या पथकाने तहसिलदार गमन गावीत यांच्यासह कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडले. सदर प्रकरणाबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुुरु होते. यात आरोपी ..संख्या वाढण्याची शकता आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here