ठाणे (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : गुरूंना वंदन करण्यासाठी साहित्यिक क्षेत्रातील कल्याणच्या लेखिका, कवयित्री,संपादक अनिता प्रविण कळसकर यांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेकरीता लेख,कविता, ऑडियो व टंकलिखित स्वरूपात आपल्या शब्दसुमने साहित्यिक मंच कल्याण,इथे वाॅटस अपच्या माध्यमातून ऑनलाईन आयोजन केले होते.
शब्दसुमने साहित्यिक मंच ,कल्याण.येथे लाॅकडाऊनच्या काळात लेखिका/ कवयित्री अनिता प्रविण कळसकर यांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यस्तरीय विविध साहित्यिक प्रकाराच्या स्पर्धेचे आयोजन गुरूने दिला ज्ञानरूपी वसा या केले होते.आपल्या भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून गुरूंना दिलेला मान सन्मान आपणां सर्वांना ठाऊकचं आहे ,अगदी द्रोणाचार्य यांनी शिष्याकडून एकलव्यला गुरूदक्षिणा म्हणून अंगठा मागतिला होता. अशी ही प्रथा.आजच्या आधुनिक काळात ही गुरूंचे महत्त्व सर्वजण जपतात.आपले प्रथम गुरू हे घरातील आई-वडील ,नंतर ज्ञान शिकवणारे शिक्षकवर्ग यांचा समावेश होतो.आपण जीवन जगत असताना अनेक क्षेत्रांत वावरताना मिळणारे चांगले वाईट अनुभव पाठीशी घेऊन संघर्ष करत आयुष्यात वाटचाल करत असतो ,पण तरीही आपली श्रद्धा ही कुठेतरी असतेच ,तात्पर्य म्हणाल तर या श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतर कधीच आपण करू नये. गुरूंना आपण नेहमीच उच्च स्थानावर विराजमान करतो ,ही आपली संस्कृती च आहे.अशाच या गुरूंना वंदन करण्यासाठी साहित्यिक क्षेत्रातील कल्याणच्या लेखिका, कवयित्री,संपादक अनिता प्रविण कळसकर यांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेकरीता लेख,कविता, ऑडियो व टंकलिखित स्वरूपात आपल्या शब्दसुमने साहित्यिक मंच कल्याण,इथे वाॅटस अपच्या माध्यमातून ऑनलाईन आयोजन केले होते.ग्रुपचे सचिव हास्यकवि श्री . दीपक आंबटकर यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले.महाराष्ट्रातील विविध भागातून स्पर्धेसाठी भरघोस प्रतिसाद मिळाला.एकूण ७०जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला .या स्पर्धेचे परीक्षण गोव्याचे प्रसिद्ध गझलकार ,कवी बा.भ.बोरकर पुरस्कृत,राष्ट्रीय साहित्य भूषण,सुरेश भट स्मृती,अनिल साठे स्मृती असे अनेक पुरस्कार प्राप्त *श्री.दत्तप्रसाद जोग यांनी केले .कविता ही भाषा,काव्यमुल्य, लय,आशय या निकषांवर तपासून पारदर्शक निकाल दिला.
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूने दिला ज्ञानरूपी वसा या विषयावरील काव्यलेखन स्पर्धेत (ऑडियो) प्रथम क्रमांक वाय .के.शेख यांच्या सुंदर सादरीकरण व रचनेस मिळाला. सुनिता पडवळ यांना द्वितीय तर हनुमंत लोणकर व दीपक अहिरे यांना तृतीय क्रमांक विभागून मिळाला.तसेच उत्तेजनार्थ मालती ब्राम्हणकर, नाशिक.प्रदीप बडदे, मुंबई.भाग्यश्री भुयार,प्रीती कारगावकर आणि अंजला पिंपळे यांना मिळाला.
लेखाचे निकाल देताना भाषाशैली तसेच सखोल मांडणी वर आधारित प्रथम क्रमांक पुण्याच्या अपर्णा दिघे, द्वितीय क्रमांक जितेंद्र कोकाटे, तृतीय क्रमांक विभागून वृंदा राव व कविता काळवीट यांना मिळाला.तसेच ठाण्याच्या संगिता कुलकर्णी , नाशिकच्या योगिता वसंत पैठणकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
लिखित कवितांमध्ये प्रथम क्रमांक कल्याणच्या सौ.विजया शिंदे, द्वितीय क्रमांक प्रल्हाद घोरबांड.तृतीय क्रमांक हैद्राबाद च्या नीता कुलकर्णी यांना मिळाला ,तसेच कर्नाटक दावणगिरी च्या सौ कविता वालावलकर,विनया तिडके, बबलू अहिरे आणि बाळा गोरे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.या सर्वांचे आयोजिका ,लेखिका अनिता कळसकर ,मार्गदर्शक श्री . संजय तांबे ,सचिव श्री.दीपक आंबटकर हास्यकवी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच विजेत्यांना ऑनलाईन सन्मानपत्रं देऊन गौरविण्यात आले. तसेच अनिता कळसकर यांनी सर्वांच्या सहकार्याने अशा भव्य स्पर्धा पार पडतात म्हणून सर्व साहित्यिक यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .तसेच परीक्षक श्री.दत्तप्रसाद जोग यांनी विविध प्रकारच्या कविता ,लेख , ऑडियो परीक्षण केले ,त्यासाठी जोग सरांचे धन्यवाद व परीक्षक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविले.साहित्यिक यांनी अनिता कळसकर यांना फोन वरून वाॅटस अपवरून अभिनंदनाचा वर्षाव केला.अशा विविधांगी स्पर्धेकरीता साहित्यिक यांना नेहमीच प्रोत्साहित होतात त्यामुळे परत लवकर स्पर्धा घेऊ असे आश्वासन अनिता ताई कळसकर यांनी सर्व शब्दसुमने कर यांना दिले.






