डोंबिवली (महाराष्ट्र रिपोर्टर अजय कल्याणे) : कोल्हापूरमध्ये आणि राज्यातील इतर ठिकाणी बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी शेतकरी आणि चालक आक्रमक झाले आहेत.त्यातच आता ठाणे जिल्ह्यातील शेतकरी हे सुद्धा आक्रमक झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आणि बैलगाडा चालकांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली आहे. आणि बैलगाडा शर्यत पुन्हा सूरु करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे.तसेच त्यांनी याबाबतचे पत्र सुद्धा मनसे आमदार राजू पाटील यांना दिले आहे.तर मनसे आमदार राजू पाटील यांनी शेतकऱ्यांचे आणि बैलगाडा चालकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि याबाबत मी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याशी बोलतो आणि आपण त्यांना भेटायला सुद्धा जाऊ असे सांगितले आहे.
यावेळी संदीप माळी, सचिन सरनोबत, विलास पाटील, सुनील मुंडे आणि शेतकरी उपस्थित होते.






