पनवेल शहर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष लतीफ भाई शेख यांचा महानगरपालिकेला दणका 

पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : पनवेल शहरातील रस्त्यांची अवस्था महानगर गॅस तसेच अनेक कारणास्तव चालू असलेल्या कामांमुळे दुर्दशा झाली आहे, त्यामुळे नागरिकांना आपल्या दैनंदिन कामामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांच्या या समस्येची दखल घेत पनवेल काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक यांनी रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेबद्दल त्वरित उपाययोजना करण्याची मागणी  १० ऑगस्ट २०२१ रोजी महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच या विषयी त्यांनी संबंधित अभियंता यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून सदर रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल लतीफ शेख यांना प्राप्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारींचे लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले होते.

पुढच्याच दिवशी दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी त्वरित नादुरुस्त असलेल्या रस्त्यांचे डागडुजी करण्याचे काम चालू केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here